पुणे | ‘जीतो युथ विंग पुणे’च्या वतीने दोन दिवसीय युथ विंग क्रिकेट प्रीमियर लीगचे आयोजन करण्यात आले असून जीतो अपेक्सचे अध्यक्ष अभय श्रीश्रीमल आणि पुणे शहर पोलीस सहआयुक्त संदीप कर्णिक यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन झाले. रविवारी (२० नोव्हेंबर) या स्पर्धेचा अंतिम सामना खेळला जाणार आहे.
जीतो पुणेची नूतन कार्यकारिणी जाहीर झाल्यानंतर ‘जीतो युथ विंग पुणे’चा हा पहिलाच कार्यक्रम आहे. उद्घाटनप्रसंगी जीतो पुणेचे अध्यक्ष राजेशकुमार सांकला, जीतो अपेक्स श्रमनचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व पुणे युथ विंग मार्गदर्शक विजय भंडारी, जीतो लेडीज विंगच्या राष्ट्रीय अध्यक्षा संगीता ललवाणी, जीतो अपेक्सचे उपाध्यक्ष कांतिलाल ओसवाल, जीतो पुणेचे मुख्य सचिव चेतन भंडारी, जीतो रोमचे अध्यक्ष अजित सेठिया, जीतो रोमचे मुख्य सचिव आदेश खिंवसरा, जीतो लेडीज विंग पुणेच्या अध्यक्ष लकीशा मर्लेचा, मुख्य सचिव मोना लोढा, जीतो युथ विंग पुणेचे अध्यक्ष निकुंज ओसवाल, मुख्य सचिव सिद्धार्थ गुंदेचा, आकाश ओसवाल, गौरव बाठिया, दीपक जैन, शुभम भंडारी, मोक्षय जैन, प्रायोजक सिद्धांत भूषण ओसवाल व सहप्रायोजक गिरीश कोंढरे आदी मान्यवर उपस्थित होते.
‘युथ विंग क्रिकेट प्रीमिअर लिग’मध्ये ३० संघ सहभागी झाले आहेत. या स्पर्धेत ३०० हून अधिक युवकांचा सहभाग आहे. ‘जीतो युथ विंग पुणे’चे सभासद वाढविणे, व्यवसायाच्या दृष्टीकोनातून नेटवर्कींग करणे हा या स्पर्धेमागचा उद्देश आहे. स्पर्धेपूर्वीच आम्ही ७० नवीन सभासद करण्यात यशस्वी झालो आहोत, अशी माहिती जीतो युथ विंग पुणेचे अध्यक्ष निकुंज ओसवाल यांनी यावेळी दिली. रविवारी (२० नोव्हेंबर) या युथ विंग क्रिकेट प्रीमियर लीगची सांगता होणार असल्याचेही ते म्हणाले.