पुणे | लायन्स क्लब इंटरनॅशनल ही जगातील सर्वात मोठी आणि सक्रिय सामाजिक संघटना आहे. ही संघटना 208 देशांमध्ये पसरली आहे. त्यामध्ये 1.34 दशलक्ष सदस्य आहेत. यातील एकूण 47 हजार सदस्यांनी लायन विजय भंडारी यांची वर्ष 2023-24 साठी डिस्ट्रीक्ट गव्हर्नर म्हणून नियुक्ती केली आहे.
डायलिसिस सेंटर, शिक्षण, कृत्रिम अवयवदान केंद्र, दवाखाने, चिल्ड्रन पार्क, शाळा, नेत्रशिबिरे, आदी तसेच गोरगरिबांचे दु:ख दूर करण्यात मदत करणारी असा 3234डी2 मधील या क्लबच्या कामगिरीचा उत्कृष्ट रेकॉर्ड आहे.
लायन विजय भंडारी हे उत्कृष्ट लायन सदस्य आणि प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व आहेत. त्यांना त्यांच्या परोपकारी दृष्टिकोनासाठी ओळखले जाते. ते संपूर्ण भारतातील कागद उत्पादन व व्यापार व्यवसायात आहेत. सुमारे 600 लोक त्यांच्या सक्षम आणि गतिशील नेतृत्वाखाली काम करत आहेत. तसेच ते विविध समाजसेवी संस्थांशी संबंधित आहेत. जीतो संस्थेचा प्रसार करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. सध्या ते जीतो श्रमण आरोग्यमचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि आशापुरा माता चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष आहेत.
दरम्यान, 4 जुलै रोजी त्यांच्या 56व्या वाढदिवसानिमित्त 56 लाख रुपयांचे विविध सामाजिक उपक्रम राबविले गेले आहेत. त्यांच्या सक्षम आणि गतिमान नेतृत्वाखाली लायन्स क्लब अनेक नवीन प्रकल्प स्थापन करतील. सेवा आणि उपक्रमांच्या क्षेत्रात नवीन उंची गाठतील, असा विश्वास लायन्स क्लबचे माजी आंतरराष्ट्रीय संचालक लायन प्रेमचंद बाफना यांनी व्यक्त केला आहे.