पुणे | लायन्स इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 3234 डी2 च्या वतीने शनिवार दि. २३ मार्च रोजी पुण्यातील म्हात्रे पुलाजवळील शुभारंभ हॉल याठिकाणी उत्सव या कार्यक्रमांतर्गत रिजन कॉन्फरन्स आयोजित करण्यात आली होती.
या कार्यक्रमांतर्गत विविध ठिकाणच्या गरजू विद्यार्थ्यांना लायन्स क्लब ऑफ पुणे शताब्दीतर्फे १५ सायकल, लायन्स क्लब ऑफ पुणे अग्रसेनतर्फे १० सायकल, लायन्स क्लब ऑफ पुणे मेट्रोतर्फे १० सायकल, लायन्स क्लब ऑफ पुणे गॅलेक्सीतर्फे ३ तर लायन्स क्लब ऑफ पुणे स्टेटस यांच्यातर्फे २ सायकल अशा एकूण ४० सायकली भेट देण्यात आल्या. या सायकल नावळी प्राथमिक विद्यालय जेजुरी, चंद्रकांत दरोडे हायस्कूल वडारवाडी आणि कै.य.ग.शोंद्रे आणि ह.तू.थोरवे महानगपालिका शाळा कात्रज येथील गरजू विद्यार्थ्यांना देण्यात आल्या आहेत.
यावेळी लायन्स इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 3234 डी2चे प्रांतपाल एमजेएफ लायन विजय भंडारी, प्रमुख पाहुणे पीआयडी एमजेएफ लायन नरेंद्र भंडारी, प्रमुख वक्ते लायन द्वारका जालान, डिस्ट्रिक्टचे सीईओ लायन शाम खंडेलवाल, खजिनदार लायन राजेंद्र गोयल, रिजन चेअरपर्सन लायन राजेंद्र गुगळे, आदी मान्यवर उपस्थित होते.