मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी शिंदे गटातील आमदार नाराज असल्याचे विधान केले होते. त्यावरून भाजप नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी भाष्य केले. ‘राज्यात शिंदे-फडणवीस सरकारच्या स्थापनेला 100 दिवस झाले आहेत. सरकार स्थापनेच्या पहिल्या दिवसापासून अजित पवार आणि नाना पटोले याबाबत भाष्य करत आहेत. मात्र, अजूनपर्यंत काहीही झालेलं नाही’, अशा शब्दांत टोला लगावला.
राज्यात भाजपच्या पाठिंब्यावर शिंदे सरकार सत्तेत आले आहे. सरकार आल्यापासून सत्ताधारी-विरोधांकडून सातत्याने आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. त्यातच अजित पवार यांनी शिंदे गटातील आमदार नाराज आहेत. काही दिवसांत खरं, खोटं काय ते समोर येईल, असे विधान केले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. ‘राज्यात शिंदे-फडणवीस सरकारच्या स्थापनेला 100 दिवस झाले आहेत. सरकार स्थापनेच्या पहिल्या दिवसापासून अजित पवार आणि नाना पटोले याबाबत भाष्य करत आहेत. मात्र, अजूनपर्यंत काहीही झालेलं नाही.’, असे म्हटले आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शिंदे गटातील सर्व आमदारांची मंत्रिपदाची मागणी आहे. त्यामुळे सरकार टिकणं कठीण असल्याचे म्हटले होते. त्यानंतर आता अजित पवार आणि चंद्रकांत पाटील यांनी यावर भाष्य केले आहे.