बीड | राज्यात मुसळधार पावसाने अक्षरश: थैमान घातले होते. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. अतिवृष्टीने झालेल्या पीक नुकसानीची पाहणी करण्यासाठी कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी जिल्हाधिकारी राधा बिनोद शर्मा (Radha Binod Sharma) यांनी ‘चहा कमी पितो’ म्हटल्यावर सत्तार यांनी ‘दारू पिता का?’ असा प्रश्न विचारला. त्यानंतर उपस्थितांमध्ये एकच चर्चा रंगली.
पीक नुकसानीची पाहणी करण्यासाठी कृषीमंत्री सत्तार बीड दौऱ्यावर आहेत. त्यावेळी त्यांच्यासोबत अर्जुन खोतकर आणि काही अधिकारी चहा पिण्यासाठी बसले होते. त्यादरम्यान जिल्हाधिकारी शर्मा यांनी ‘चहा कमी पितो’ असे म्हटले. त्यावर अब्दुल सत्तार यांनी ‘दारू पिता का?’, असा प्रश्न विचारला. त्यांच्या वक्तव्यानंतर तिथे असलेल्या सर्वांमध्ये एकच हशा पिकला.
दरम्यान, कृषीमंत्री अब्दुल सत्तार आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे सतत चर्चेत असतात. राज्यात सर्वत्र पावसाने थैमान घातलं असून, शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे त्यात आता अब्दुल सत्तार यांनी आणखी एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.
काँग्रेसकडून टीका
सत्तार यांच्या या विधानाचा व्हिडिओ काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी ट्विटरवरून शेअर केला आहे. त्यामध्ये त्यांनी ‘अतिवृष्टी पाहणी दौरा की मद्यसृष्टी पाहणी दौरा?,’ असा प्रश्न उपस्थित करत कविता ट्विट केली आहे. “गम का दौर हो या हो खुशी, समा बाँधती है शराब, किसान मरे या करे खुदकुशी, समा बाँधती है शराब, एक मशवरा है जनाब के थोड़ी-थोड़ी पिया करो, हुई महँगी बहत ही शराब, के थोड़ी-थोड़ी पिया करो,