मुंबई | कोरोना महामारीनंतर गेल्या काही महिन्यांपासून रखडलेली पोलिस भरती येत्या 3 नोव्हेंबरपासून सुरु करण्याचे आदेश राज्य सरकारकडून देण्यात आले होते. मात्र, आता 14 हजारांपेक्षा जास्त जागांसाठी होणारी भरती प्रक्रिया प्रशासकीय कारणास्तव स्थगित करण्यात आल्याचे सरकारकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे लाखो तरुणांची निराशा झाली आहे.
राज्य सरकारकडून पोलिस भरतीला 27 ऑक्टोबर रोजी हिरवा सिग्नल दिला गेला होता. मात्र, दोन दिवसांतच या निर्णयाला स्थगिती दिली आहे. जुन्या वेळापत्रकानुसार, फॉर्म भरण्याची प्रक्रिया 3 नोव्हेंबरपासून ते 30 नोव्हेंबरपर्यंत असे सुमारे 27 दिवसांचे नियोजन होते. त्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांमध्ये मोठा उत्साह होता. मात्र, आता राज्य सरकारने या निर्णयाला स्थगिती दिली आहे.
दरम्यान, 27 ऑक्टोबर रोजी पोलिस महासंचालक संजय कुमार यांनी पदे भरण्याबाबत परिपत्रक जारी केले होते. त्यानंतर अवघ्या 48 तासात या भरतीला प्रशासकीय स्थगिती देण्यात येत आहे.