मुंबई | टाटा-एअरबस (Tata-Airbus) आणि वेदांता फॉक्सकॉन (Vedanta-Foxconn) यांसारखे प्रकल्प महाराष्ट्राच्या बाहेर गेले आहेत. त्यामुळे राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर विरोधकांकडून कडाडून टीका केली जात आहे. मात्र, आता रांजणगाव इलेक्ट्रॉनिक हब (Ranjangaon Electronic Hub) बनवण्यासाठी केंद्राने 500 कोटींच्या मेगा प्रकल्पाला मंजुरी दिल्याने महाराष्ट्र सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे.
राज्यात नियोजित तीन प्रकल्प राज्याबाहेर गेले आहेत. त्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. पण आता केंद्र सरकारने महाराष्ट्रात इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर प्रोजेक्ट अंतर्गत नवीन प्रकल्प येणार असल्याची घोषणा केली आहे. त्यानुसार, पुणे जिल्ह्यातील रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील टप्पा क्रमांक 3 अंतर्गत कर्डे येथे 300 हेक्टरवर हे नवीन प्रकल्प येत आहेत. या प्रकल्पामुळे राज्यातील तरुणांना रोजगाराची संधी मिळेल, असे सांगितले जात आहे.