मुंबई | राज्यात शिंदे-फडणवीस यांचे सरकार सत्तेत आहे. हे सरकार पडेल, असे विरोधी पक्षांच्या नेतेमंडळींकडून अनेकदा विधाने केली जात आहेत. त्यात आता विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी त्यावर म्हटले की, ‘जोपर्यंत 145 आमदारांचा पाठिंबा एकनाथ शिंदेंना आहे तोपर्यंत हे सरकार चालेल. पण ज्यादिवशी हा आकडा कमी होईल, त्या दिवशी हे सरकार जाईल’.
गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून सरकार अस्थिर होण्याची विधाने केली जात आहेत. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देखील सरकार पडणार असल्याचे म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्यावरून अजित पवार यांना विचारले असता ते म्हणाले, ‘जोपर्यंत १४५ आमदार एकनाथ शिंदेंच्या पाठिशी आहेत, तोपर्यंत हे सरकार चालेल. पण ज्यादिवशी हा आकडा कमी होईल, त्या दिवशी हे सरकार जाईल. त्यांच्या या वक्तव्यानंतर एकच चर्चा रंगली आहे.
काय म्हणाले होते जयंत पाटील?
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटणार नाही. मात्र, राज्यातील सरकार कोसळेल, असे विधान जयंत पाटील यांनी केले होते. त्यांच्या याच वक्तव्यानंतर अजित पवार यांनी वक्तव्य केले आहे.