मुंबई | सातत्याने वादग्रस्त करून तेढ निर्माण करणारे राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. आता त्यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्याबाबत वादग्रस्त विधान केले आहे. त्यावरून भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी ”एखादा व्यक्ती जे बोलतो, त्या बोलण्याचं भांडवल न करणेही सुद्धा आपली जबाबदारी आहे. कोणीही किंवा मीडियानेही याचं भांडवल करु नये, असे म्हणत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.
सुप्रिया सुळे यांनी अब्दुल सत्तार यांना ‘खोके’ घेतल्याच्या आरोपावरून लक्ष्य केले होते. त्यानंतर सत्तार यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर खालच्या भाषेत टीका केली. यावर माजी मंत्री आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी म्हटले की, ‘कोणत्याही पक्षाच्या नेत्यानं महिलांबाबत असं वक्तव्य करु नये. जर टीका करण्याची पातळी घसरत असेल तर ते अयोग्य आहे. राजकारणाची पातळी घसरु नये याची काळजी सर्वांनी घेणं आवश्यक आहे’.
तसेच त्या म्हणाल्या, ”एखादा व्यक्ती जे बोलतो, त्या बोलण्याचं भांडवल न करणं ही सुद्धा आपली जबाबदारी आहे. कोणीही किंवा मीडियानेही याचं भांडवल करु नये”.