मुंबई | कथित 100 कोटी रुपयांच्या वसुली प्रकरणात निलंबित पोलिस अधिकारी सचिन वाझे (Sachin Waze) याला पीएमएलए न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. मात्र, तरीही त्याचा मुक्काम तुरुंगातच असणार आहे. कारण दोन प्रकरणात वाझेला अद्याप जामीन मिळालेला नाही.
सचिन वाझे याचे नाव 100 कोटी रुपयांच्या वसुली प्रकरणात आले आहे. त्यामुळे त्याच्यावर कारवाई करण्यात आली. तसेच अन्य दोन प्रकरणांवरूनही खटला सुरु आहे. या दोन्ही प्रकरणात सचिन वाझेला जामीन मिळाला नाही. त्यामुळे सचिन वाझेला तुरुंगातच राहावे लागणार आहे. अनिल देशमुख यांना याप्रकरणी जामीन मिळाला आहे. आता तीच भूमिका सचिन वाझे सुनावणीत आहे.
दरम्यान, सचिन वाझेच्या जामीन अर्जावर 15 नोव्हेंबरला सुनावणी झाली होती. मात्र, आज न्यायालयाने यावर निर्णय दिला आहे. न्यायालयाच्या या निर्णयाने वाझेला दिलासा मिळाला नसल्याचे स्पष्ट झाले आहे.