मुंबई | महाराष्ट्रातील राजकारणात गेल्या काही दिवसांपासून विविध घडामोडी घडताना दिसत आहे. सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर टीका टिप्पणी केली जात आहे. मात्र, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून यावर अद्याप कोणतेही भाष्य केले जात नव्हते. पण आता मनसेचे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी एक ट्विट केले असून, त्याची सर्वत्र चर्चा सुरु आहे.
राज्यात कोणत्याही राजकीय घडामोडी झाल्या तर त्यात राज ठाकरे हे त्यांची भूमिका मांडत. पण हेच राज ठाकरे गेल्या काही दिवसांपासून सार्वजनिक कार्यक्रमात किंवा कोणतीही विधानं करताना दिसत नव्हते. पण आता मनसेच्या संदीप देशपांडे यांच्याकडून ट्विट करण्यात आले आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटले की, 27नोव्हेंबर “सबका हिसाब होगा”!!.
संदीप देशपांडे यांनी आज पत्रकार परिषद घेत विविध मुद्द्यांवर भाष्य केले. त्यामध्ये त्यांनी आगामी मनसेच्या मेळाव्याबाबतही माहिती दिली. तसेच 27 नोव्हेंबर रोजी नेस्कोला दुपारी चार वाजता गटाध्यक्षांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात मनसेप्रमुख राज ठाकरे संबोधित करणार असल्याचे त्यांनी सांगितले.