मुंबई | उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची बुलढाण्यात जाहीरसभा झाली. त्यावेळी त्यांनी मुळमुळीत भाषण केले. उद्धव ठाकरे सावरकरांबाबत का नाही बोलले? ज्या राहुल गांधींनी सावकरांचा अपमान केला, त्यांच्याशी आदित्य ठाकरे जाऊन गळाभेट घेत आहेत. आदित्य ठाकरे तर पिल्लू आहे, अशा शब्दांत केंद्रीयमंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी टीका केली.
मुंबई येथे आयोजित पत्रकार परिषदेत नारायण राणे बोलत होते. यावेळी त्यांनी शिवसेना, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले, ”उद्योगधंदे राज्याबाहेर गेल्याचे म्हटले जात आहे. मात्र, उद्धव ठाकरेंच्या अडीच वर्षांच्या काळात जे उद्योग गेलेत. त्याबाबत कुणीही काही बोलत नाही. ज्या कंपन्या बाहेर गेल्यात, त्या कंपन्यांशी दीड वर्ष उद्धव ठाकरेच बोलत होते. मुख्यमंत्री म्हणून अडीच वर्षात फक्त अडीच तासच खुर्चीवर बसले”.
‘वेल डन’ म्हणाले असतील…
उद्धव ठाकरे सावरकरांबाबत का बोलले नाहीत. ज्या राहुल गांधींनी सावरकरांचा अपमान केला त्यांच्याशी आदित्य ठाकरे जाऊन गळाभेट घेतात. मला तर वाटतं राहुलला मिठी मारल्यावर आदित्य ठाकरे त्यांच्या कानात ‘वेल डन’ म्हणाले असतील, असेही त्यांनी सांगितले.