मुंबई | शिवसेना पक्षफुटीनंतर ठाकरे गट (Thackeray Group) आणि शिंदे गट (Shinde Group) निर्माण झाले. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) भाजपच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले. त्यानंतर शिवसेनेतील अनेक आमदार, खासदार त्यांच्यासोबत गेले आहेत. आता माजी आमदारानेही ठाकरे गटाला रामराम करत शिंदे गटात प्रवेश केला आहे.
विलेपार्ले विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार कृष्णा हेगडे यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हेगडे यांचा शिंदे गटातील प्रवेश ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे. हेगडे यांचे माजी खासदार संजय निरुपम यांच्यासोबत पटत नसल्याने त्यांनी 2016 साली काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिली. त्यानंतर त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना साथ देत भाजपमध्ये प्रवेश केला होता. काही काळ ते शिवसेनेत होते. मात्र, आता त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे.