मुंबई | भाजप नेते प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत वादग्रस्त विधान केले होते. त्यांच्या या विधानानंतर लाड यांच्यावर टीका केली जात आहे. त्यानंतर आता माजी खासदार संभाजीराजे (Sambhajiraje) यांनी यावर संताप व्यक्त केला.
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील अनेक नेतेमंडळींकडून वादग्रस्त वक्तव्य करून तेढ निर्माण केला जात आहे. त्यात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यासह इतर नेतेमंडळींकडून विधाने केली गेली आहेत. यामध्ये प्रसाद लाड यांची भर पडली आहे. लाड यांच्या विधानानंतर संभाजीराजे हे चांगलेच संतापले आहेत.
संभाजीराजे यांनी लाड यांच्या विधानाचा समाचार घेत ‘जरा तरी लाज ठेवा. त्यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देणे मूर्खपणा आहे. त्यांच्यावर शिवभक्त हसत आहेत’, असे म्हटले आहे.