मुंबई | ”आम्ही मागच्यावेळी सरकारमध्ये असताना मी अर्थसंकल्पात जे जाहीर केलं होतं त्यालाही शिंदे-फडणवीस सरकारने स्थगिती दिली. त्यामुळे काही गावांच्या कामांना निधी थांबला. अरे कुणाच्या बापाच्या घरच्या निधी आहे का? हा सरकारचा निधी आहे”, असा संतप्त सवाल विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला.
महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन्ही राज्यात सीमाप्रश्नावरून वादंग निर्माण झाला आहे. त्यावरही अजित पवार यांनी संताप व्यक्त केला. ते म्हणाले, ”आयला ते कर्नाटकवाले सारखे शिव्या घालत आहेत. आपल्या गाड्या फोडत आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले मी बैठक घेतो. तर बोम्मई म्हणाले मी बैठकीलाच येणार नाही. एक इंचही जागा सोडणार नाही, असे ते म्हणाले. अरे चर्चेतून मार्ग निघतो ना”.
सीमाप्रश्नावरून महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आणि सत्ताधाऱ्यांवर टीका केली जात आहे. त्यानंतर आता अजित पवार यांनी भाष्य केले आहे.