औरंगाबाद | उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यावर शनिवारी शाईफेक करण्यात आली. त्यावर शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी अभिनंदन केले. ”समर्थन जरी केलं नसलं तरी मी त्याचं अभिनंदन करतो”, असे खैरे म्हणाले.
चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेकीची घटना घडल्यानंतर राजकीय नेतेमंडळींकडून यावर प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही आपलं मत व्यक्त केले. त्यानंतर आता खैरे यांनीही विरोधात भूमिका घेतली आहे. ते म्हणाले, ”फुले, आंबेडकर यांच्याबाबत केलेल्या विधानावरून राग आलेला आहे म्हणून शाईफेक झाली. जो कोणी उठतो तो छत्रपती शिवाजी महाराजांबाबत बोलतो. राज्यपाल काहीही बोलत आहे. त्यांचं धोतर सोडल्याचा व्हिडिओ पाहिला. राज्यपालांचा किती अपमान व्हायला लागला आहे. हे समजून घेऊन त्यांनी उडी मारून उत्तराखंडला गेलं पाहिजे”.
तसेच राग दिसला पाहिजे. महात्मा फुले-सावित्रीबाई फुलेंचा अपमान केला जातो. पत्रकारांनी उठाव केला जेव्हा त्यांना काहीतरी वेगळं होईल, असे वाटले. त्यामुळे त्या पत्रकाराला सोडून देण्यात आले, असेही ते म्हणाले.