सातारा | आम्हाला परवानगीबद्दल विचारत बसायचं नाही. पाहिजे तिथे आणि पाहिजे तेव्हा मोर्चा काढणार, आम्हा लोकांना विचारायचं नाही. सांगून जातो इथून, परत परत सांगायला लावू नका, नाहीतर पोलीस स्टेशनमध्ये येऊन धिंगाणा घालणार असा दमच भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी दिला.
साताऱ्यातील पाटण तालुक्यात झालेल्या हिंदू जन आक्रोश मोर्चात नितेश राणे सहभागी झाले होते. त्यावेळी त्यांनी हे विधान केले. ते म्हणाले, ”आम्हाला परवानगीबद्दल विचारत बसायचं नाही. पाहिजे तिथे मोर्चा काढणार, पाहिजे तेव्हा मोर्चा काढणार, पाहिजे तेव्हा घरी जाणार. आम्हा लोकांना विचारायचं नाही. सांगून जातो इथून, परत परत सांगायला लावू नका, नाहीतर पोलीस स्टेशनमध्ये येऊन धिंगाणा घालणार आणि तुम्ही काहीही करू शकणार नाही. लोकांच्या उपस्थिती सांगतोय, काही होत नाही”.
तसेच एसपी, बिसपी खूप पाहिले. पण राजकारणात काही होत नाही. उगाच आम्हाला हिंमत दाखवायची नाही, पकडा त्या अनधिकृत धंद्यावाल्यांना त्यांना पकडून दाखवायचे, तुम्हाला जे काही मेडल हवे आहे, ते सरकारमधून मिळवून देऊ. पण उगाच सिंघमगिरी माझ्यासमोर करू नका, असा दमही त्यांनी पोलिसांना भरला.