मुंबई | गेल्या काही दिवसांपासून राज्य मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार याकडे सत्ताधारी आमदारांसह सर्वच इच्छुकांचे डोळे लागले आहेत. मात्र, आता या मंत्रिमंडळ विस्तारावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी भाजपचे वरिष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांची भेट घेतली. या भेटीत चर्चा होणार असल्याचे सांगितले जात आहे.
मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस हे आज दिल्लीमध्ये आहेत. महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर शिंदे आणि फडणवीस यांची अमित शहा यांच्यासोबत चर्चा होणार असल्याचेही म्हटले जात आहे. या बैठकीला कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई देखील सहभागी असणार आहेत. महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावरील चर्चेनंतर शिंदे-फडणवीस आणि अमित शहा यांच्यात राज्य मंत्रिमंडळ विस्तारावरही चर्चा होणार असल्याची माहिती दिली जात आहे.
अमित शाह यांच्यासोबत मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा झाल्यानंतर विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी किंवा त्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.