मुंबई | काही दिवसांपूर्वीच जिल्हा दूध संघाची निवडणूक झाली. या निवडणुकीत एकनाथ खडसे गटाचा (Eknath Khadse) पराभव झाला. तर गुलाबराव पाटील आणि गिरीश महाजन यांच्या गटाने बाजी मारली. त्यानंतर आता भाजप आमदार मंगेश चव्हाण (Mangesh Chavan) यांनी या निवडणुकीबाबत भाष्य केले. ”राष्ट्रवादीच्याच पदाधिकाऱ्यांकडून एकनाथ खडसे यांच्या पराभवासाठी मला फोन आले होते”, असे त्यांनी अप्रत्यक्षरित्या सांगितले.
जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत खडसे गटाचा पराभव झाला. खडसे यांच्या पराभवानंतर मंत्री गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांच्यावर टीकास्त्र सोडले. त्यानंतर आता मंगेश चव्हाण यांनी या निवडणुकीबाबत मोठं विधान केले आहे. ”निवडणुकीपूर्वी मला राष्ट्रवादीच्या अनेकांचा फोन आला. त्यांनी मला सांगितलं की कोणाला सांगू नका, खडसे राष्ट्रवादीत आल्याने आमचा ताण वाढला आहे. खडसे यांचा पराभव करा”, असे चव्हाण यांनी एकनाथ खडसे यांचे नाव न घेता म्हटले आहे.