नागपूर | राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयंत पाटील (Jayant Patil) यांनी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केले होते. या वक्तव्यानंतर सत्ताधाऱ्यांनी जोरदार टीका केली होती. त्यानंतर आता जयंत पाटील यांना निलंबित करण्यात आले आहे.
हिवाळी अधिवेशनामध्ये बोलू दिलं जात नसल्यामुळे अध्यक्ष महोदय, असा निर्लज्जपणा करू नका, असे म्हणत जयंत पाटील यांनी संताप व्यक्त केला होता. त्यामुळे जयंत पाटील यांच्यावर हिवाळी अधिवेशन संपेपर्यत निलंबन करण्यात आले आहे. हिवाळी अधिवेशनामध्ये आज सत्ताधारी विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. दिशा सालियान प्रकरणावर विरोधकांना बोलू दिलं नाही. त्यामुळे राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या आमदारांनी जोरदार मागणी केली.
राहुल नार्वेकर यांनी विरोधकांना बोलण्याची परवानगी नाकारली. त्यामुळे जयंत पाटील यांनी असा निर्लज्जपणा करू नका, असं वक्तव्य केले होते. त्यानंतर मंत्री चंद्रकांत पाटील यांनी जयंत पाटील यांच्या निलंबनाचा ठराव मांडला. हा ठराव सत्ताधाऱ्यांकडून संमतही करण्यात आला.