मुंबई | शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते अनिल परब (Anil Parab) यांची संपत्ती सक्तवसुली संचालनालयाकडून (ED) जप्त करण्यात आली आहे. दापोलीतील साई रिसॉर्टप्रकरणी ईडीकडून ही कारवाई झाली आहे. यासंदर्भात ईडीने सविस्तर परिपत्रक काढले आहे.
अनिल परब यांच्याशी संबंधित साई रिसॉर्ट प्रकरणी ही कारवाई करण्यात आली. ईडीने जप्त केलेली मालमत्ता ही 10 कोटींपेक्षा जास्त आहे. जप्त करण्यात आलेल्या मालमत्तेमध्ये रत्नागिरीतील 42 गुंठे जमीन आणि तिथे बांधलेल्या साई रिसॉर्टचा समावेश आहे.
साई रिसॉर्टशी संबंधित परवानग्या मिळवताना स्वतःची मालक म्हणून अनिल परब यांनी ओळख लपवली. विभास साठे नावाच्या व्यक्तीच्या नावाने सर्व परवानग्या अनिल परब यांनी मिळवल्या, असे या प्रेस नोटमध्ये सांगण्यात आले आहे.