नाशिक | राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी शेलक्या शब्दात भाजपचे आमदार नितेश राणे यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. राणे यांनी त्यांच्यावर टीका केली खरी मात्र अमोल कोल्हेंनी त्यांचा चांगलाच समाचार घेतला. नितेश राणे कोण? त्यांची भूमिका हि पक्षाची अधिकृत भूमिका आहे का? भाजपच राणेंना किंमत देत नाही जे वडिलांच्या कर्तृत्वावर पोळ्या भाजणारे आहेत. याशिवाय नितेश राणे यांचे नाव घेणं टाळत त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास पोहोचवण्यासाठी काही योगदान दिलं आहे का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणाला सुसंस्कृत पणाचा आदर्श आहे. सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेल्या लोकांनी जास्त बोलू नये असा खोचक टोलाही त्यांनी राणेंना लगावला आहे. अभिनय हे माझ्या उत्पनाचं साधन आहे. मी उजळ माथ्याने सांगतो असं त्यांनी सांगाव. इतिहास मांडण्यासाठी मी राजकारण आणत नाही असेही अमोल कोल्हे यांनी स्पष्ट केलं आहे.
दरम्यान, नितेश राणे यांनी अमोल कोल्हे यांना २४ ला आपटून टाकू, पैसे घेऊन रोल करतो असे म्हणत दाढी काढली तर कोणी ओळखतं का अशी टीका केली होती. त्यावर कोल्हे यांनी त्यावर पलटवार केला आहे.