मुंबई | ”पंकजा मुंडे (Pankaja Munde) आणि पक्षाला बदनाम करणारा एक गट भाजपमध्येच आहे. तेच ही बदनामी करत आहेत. कालच्या माझ्या संपूर्ण प्रवासात पंकजा मुंडे माझ्यानंतरच बोलल्या. मी पंकजा मुंडेंना प्रथम स्थान दिलं. ती माझी जबाबदारी आहे”, असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी केले.
बीडमधील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देत होते. ते म्हणाले, ”पंकजा मुंडे माझ्याशी रोज बोलतात. माझी आणि त्यांच्याशी परवाच चर्चा झाली. परवा त्यांची प्रकृती ठीक नव्हती. कधीकधी व्यक्तिगत अडचणी येत असतात. आज देवेंद्र फडणवीस बीडमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून गेले आहेत. त्या कार्यक्रमाला एखादा आमदार नसेल तर त्याने दांडी मारली असे म्हणायचे का?”
तसेच बावनकुळे पुढे म्हणाले, ”पंकजा मुंडे आमच्या नेत्या आहेत. त्या आमच्या राष्ट्रीय सचिव आहेत. त्यामुळे त्यांना नंतर बोला, मी आधी बोलतो हा त्यामागील आशय होता”.