मुंबई | सध्या पुण्यामध्ये कसबा आणि चिंचवड मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा प्रचार चालू आहे. भारतीय जनता पक्षासह मविआकडून देखील जोरदार प्रचार केला जात आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षाचे अनेक नेते निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पुणे दौरा केला त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी चांगलाच टोला लगावला आहे.
पुणे दौऱ्यावर येऊन देखील शाह यांनी भाजपचा प्रचार करणं टाळलं आहे. या पोटनिवडणुकीचा निकाल काय लागणार आहे हे शाह यांनी अचूक हेरलं आहे त्यामुळे त्यांनी प्रचार केला नाही असा टोला पवार यांनी लगावला आहे.
दरम्यान, रोहित पवार यांनी अत्यंत अचूक अंदाज बांधणारे, सूक्ष्म रणनीतिकार, निवडणूक नियोजनातले निष्णात व्यक्तिमत्त्व म्हणजे अमित शाह. पुण्यात येऊनही त्यांनी कसबा आणि चिंचवडला प्रचार करणं टाळलं, हे खूप काही सांगून जाणारं आहे. कदाचित प्रदेश भाजपाविरोधातील असंतोष आणि संभाव्य ‘निकाल’ त्यांनीही हेरला असावा असे ट्वीट केले आहे.