मुंबई | विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी भाकरी फिरवण्याविषयी भाष्य केलं आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा असलेले शरद पवार यांनी मागील काही दिवसांपूर्वी भाकरी फिरवली नाही तर ती करपते विलंब करून चालणार नाही असं म्हटलं होत. त्यावर अखेर अजित पवार यांनी शरद पवार असं का म्हटले हे स्पष्ट केलं आहे.
आता आपण राष्ट्रवादी कॉग्रेसच्या अध्यक्षपदावरुन निवृत्ती घेणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्यावरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. यामुळे कार्यकर्त्यांना मोठा धक्काही बसला आहे. शरद पवार यांनी आपल्याकडे आणखी तीन वर्षांचा कालावधी असून त्यानंतर केवळ मार्गदर्शकांच्या भूमिकेत असणार असल्याचे बोलून दाखवले. शरद पवार यांचा हा निर्णयच भाकरी फिरवण्यासारखा होता. दुसरा कोणताही मुद्दा नव्हता किंवा कोणाला उद्देशून देखील म्हटलं नाही असेदेखील अजित पवार म्हटले आहे.
दरम्यान, लोक माझे सांगाती या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचा प्रकाशन सोहळा मुंबईतील यशवंतराव चव्हाण सभागृहात पार पडला. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी या निर्णयाला कडाडून विरोध केला.