पुणे | सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यापरिषदेच्या सदस्यपदी वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्थेचे आर्टस्, कॉमर्स अॅण्ड सायन्स् कॉलेजचे प्राचार्य डॉ. संजय माधव सानप यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६, कलम ६२ मधील तरतुदीनुसार त्यांच्या सदस्यत्त्वाची मुदत दिनांक ३१ ऑगस्ट २०२७ पर्यंत असणार आहे. अशी माहिती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांनी दिली. त्याचबरोबर सानप यांच्या ज्ञानाचा आणि अनुभवाचा विद्यापरिषदेच्या कामकाजात लाभ होईल अशी आशा देखील त्यांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु प्राचार्य डॉ. सुरेश गोसावी यांनी कुलपती यांच्याशी विचारविनिमय करूनच हा निर्णय घेण्यात आला.