यंदाचं वर्ष हे निवडणूकांचं वर्ष आहे. मुळात नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधान पदाच्या दुसऱ्या सत्राचं हे शेवटचं वर्ष आहे.नरेंद्र मोदी व त्यांच्या सरकारनं गेल्या 10 वर्षात अनेक नव्या योजना काढल्या.विशेष म्हणजे या योजनांच्या आधारावर देशातील उद्योग क्षेत्रालाही बळ मिळाल्याचं आणि देशाची अर्थव्यवस्था 1 ट्रिलियन डॉलर्सपर्यंत पोहोचल्याचा दावा सातत्यानं भाजपकडून केला जातो.या सर्व गोष्टी लक्षात घेता आणि आगामी निवडणूकांचा विचार करता यंदाचा अर्थसंकल्प नरेंद्र मोदी सरकारसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय.देशाच्या अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी यावर्षीचा अर्थसंकल्प सादर केला.या अर्थसंकल्पात कोणकोणते महत्त्वाचे मुद्दे आहेत तेच आपण या व्हिडीओतून पाहणार आहोत..