पुणे । पुणे जिल्ह्यातील वकिलांची शिखर संघटना असलेल्या पुणे बार असोसिएशन’ची वार्षिक निवडणूक ३१ जानेवारी रोजी होणार होती. परंतु मतदार यादीवर वकीलवर्गाने आक्षेप घेतल्यामुळे हि निवडणूक पुढे ढकलण्यात आली. आता निवडणूक प्रक्रिया कशी पार पडेल याविषयीची माहिती निवडणूक प्रमुख आयुक्त व पुणे बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ॲड.एन.डी.पाटील यांनी दिली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार ३ फेब्रुवारी रोजी नवीन मतदान यादी जाहीर करण्यात येईल. ८ फेब्रुवारीपर्यंत यादीवर आक्षेप घेता येईल. १२ फेब्रुवारीला अंतिम यादी जाहीर केली जाईल तर १६ फेब्रुवारी रोजी मतदान व मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे. अधिकची माहिती सदर व्हिडिओतून पाहुयात…