मुंबई । आज राज्य मंत्रीमंडळाची बैठक मंत्रालयात पार पडली. या बैठकीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अध्यक्षस्थानी होते. या मंत्रीमंडळ बैठकीत २० महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. मुंबईकरांना यावर्षी देखील दिलासा देण्यात आला आहे. मालमत्ता कर वाढ न करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री अजित पवार व मंत्री मंडळातील सदस्य उपस्थित होते. यावेळी कोणते २० महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत ते पाहुयात…
कॅबिनेट बैठकीत झालेले २० महत्वाचे निर्णय !
१ ) मुंबईकरांना यावर्षी देखील मालमत्ता करात वाढ नाही (नगरविकास विभाग)
२ ) राज्यात नमो महारोजगार मेळावे आयोजित केले जाणार तसेच 2 लाख रोजगार, स्वयंरोजगार निर्माण करणार (कौशल्य विकास विभाग)
३ ) ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री वयोश्री योजनेतून 65 वर्षावरील नागरिकांना लाभ देणार (सामाजिक न्याय विभाग)
४ ) राज्यातील सर्व पालिकांमध्ये नगरोत्थान महाभियान राबवले जाणार (नगर विकास विभाग)
५ ) उत्पन्नवाढीसाठी शेतकऱ्यांना बांबू लागवडीसाठी अनुदान देणार (वन विभाग )
६ ) मधाचे गाव योजना संपूर्ण राज्यात राबवणार. मध उद्योगाला बळकटी देणार (उद्योग विभाग)
७ ) पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी जुन्नर तालुक्यात बिबट सफारी होणार (वन विभाग)
८ ) बंजारा, लमाण समाजाच्या तांड्यांचा विकास करणार. त्यांना मूलभूत सुविधा देणार (ग्राम विकास विभाग)
९ ) शिर्डी विमानतळाचा अधिक विस्तार, नवीन इमारत उभारणी करण्यात येणार (सामान्य प्रशासन विभाग)
१० ) धारावी पुनर्वसनासाठी केंद्राची मिठागर जागा मागणार (गृहनिर्माण विभाग)
११) सेवानिवृत्त न्यायिक अधिकाऱ्यांना सुधारित भत्ते दिले जाणार (विधि व न्याय विभाग)
१२ ) स्व.बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन सांगोला प्रकल्पास सुधारित मान्यता दिली जाणार (जलसंपदा विभाग)
१३ ) बिगर कृषी सहकारी संस्थांना अर्थसहाय्य. पतसंस्थांना मजबूत करणार (सहकार विभाग)
१४ ) कोंढाणे लघु प्रकलपाच्या कामासाठी अधिक खर्चास मान्यता (जलसंपदा विभाग)
१५ ) तिवसे लघु पाटबंधारे योजनेची पुनर्स्थापना करणार(जलसंपदा विभाग)
१६ ) नांदेडच्या गुरुद्धारासाठी तख्त सचखंड श्री हजूर साहिब गुरुद्धारा अधिनियम लागू करण्यात येणार (महसूल विभाग)
१७ ) महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची प्रतिमा उंचावण्यासाठी जनसंपर्क अधिकारी नेमणार (सामान्य प्रशासन विभाग)
१८ ) कृषी विद्यापीठातील शिक्षकांच्या सेवानिवृत्तीचे वय आता साठ वर्ष केले जाणार (कृषी विभाग)
१९ ) सिंधुदुर्ग जिल्ह्यात सार्वजनिक बांधकामचे नवीन मंडळ कार्यालय उभारले जाणार (सार्वजनिक बांधकाम विभाग)
२०) गोसेवा आयोगासाठी सहआयुक्त पशुसंवर्धन पद (पशुसंवर्धन विभाग)