मुंबई | आज मंत्रालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाच्या बैठक पार पडली यामध्ये विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेत. मंत्रिमंडळ बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते.
मंत्रिमंडळाच्या बैठकीतील संक्षिप्त निर्णय
– मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेत अतिरिक्त ७ हजार कि.मी. रस्ते व पुलाची कामे करणार
– औद्योगिक क्षेत्रात पायाभूत सुविधांना प्रोत्साहन देऊन मुद्रांक शुल्कात ५० टक्के सवलत देणार
– उच्च तंत्रज्ञानाच्या अतिविशाल उद्योगांना प्रोत्साहन देणार. राज्यातील कमी विकसित भागांना यामुळे फायदा होणार
-शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील इंटर्नशिप विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनात भरीव वाढ. आता मिळणार दरमहा १८ हजार रुपये.
– राज्य शासकीय कर्मचाऱ्यांची मागणी मान्य. आश्वासित प्रगती योजनेत सुधारणा करणार
– सायन कोळीवाड्यातील सिंधी निर्वासितांच्या २५ इमारतींचा पुनर्विकास करणार. म्हाडा विकास करणार
– अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजनेसाठी सुधारित मार्गदर्शक सूचना
– राज्यात जळगाव, लातूर, बारामती, सांगली (मिरज), नंदुरबार, गोंदिया या सहा ठिकाणी नर्सिंग महाविद्यालय बांधणार
– ऑनलाईन पद्धतीने वाळू, रेती पुरविण्यासाठी सर्वंकष सुधारित रेती धोरण. ‘ना नफा, ना तोटा’ तत्त्वावर वाळू विक्री दर निश्चित करणार
– भुदरगड तालुक्यात नवीन समाजकार्य महाविद्यालय