मुंबई | काल बारामातीमधून अजित पवार यांनी बोलताना शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका करत भावनिक न होण्याचं बारामतीकरांना आवाहन केलं होतं. त्यावर प्रतिउत्तर देताना लोकांची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न अजित पवारांकडून केला जात आहे. लोक सत्य काय आहेत ते जाणून आहेत. जनता आमच्यासोबत आहे. भावनिक आवाहन करण्याची आम्हाला गरज नाही, असा हल्लाबोल शरद पवार यांनी केला आहे. बारामतीचा मतदार सुज्ञ आहे. योग्य निर्णय घेईल, असेही त्यांनी म्हटले आहे.
विधानसभा अध्यक्ष वेगळा निर्णय देणार नाही, याची खात्री होती. सगळ्या देशाला माहित आहे की, राष्ट्रवादी पक्षाची स्थापना कुणी केली. तरी सुद्धा पक्ष दुसऱ्यांना देणे हा अन्याय आहे. आयोगाचा निर्णय अन्यायकारक आहे. शिवसेनेसोबतही त्यांनी असाच निर्णय घेतला, आम्ही सुप्रीम कोर्टात जाण्याची तयारी केली असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
मी अनेक निवडणूक अनेक चिन्हवर लढलो. एखाद्याच्या वाटत असेल की एखाद्याची चिन्ह काढून घेतली तर त्याचं अस्तित्व काढून घेऊ पण तसं होत नाही. नवीन चिन्ह आपल्याला मिळेल, ते लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे. पक्ष आणि चिन्हाबद्दल निर्णय सेटलमेंट करून घेतला गेला, असा आरोप देखील शरद पवार यांनी केला आहे. आपल्यावर अन्याय होणारे निर्णय होतील. पक्षाला पुढची तयारी केली पाहिजे, त्यासाठी आम्ही वरच्या कोर्टात गेल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे.
आव्हाडांना पक्षाची भूमिका मांडण्याचा अधिकार
ते पुढे म्हणाले की, धनंजय मुंडे जे बोलले त्यांनी राष्ट्रवादीत त्यांचा कालखंड गेला. त्याच्या कितीतरी वर्षापासून जितेंद्र आव्हाड हे राष्ट्रवादी पक्षात काम करत आहेत. जितेंद्र आव्हाड यांनी देश आणि राज्य पातळीवर काम केले आहे. ते मंत्री राहिले आहेत. आव्हाड यांना पक्षाची भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. आव्हाडांनी काय बोलावे याचे मार्गदर्शन करण्याची अन्य लोकांना गरज नाही, असा टोला शरद पवार यांनी लगावला आहे.