मुंबई। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजप नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात अनेकदा गाठी भेटी झाल्याचं दिसून आलं. तसेच अनेकदा भाजप-मनसे युती होणार असल्याच्या चर्चा देखील रंगल्या आहेत. असं असताना आता पुन्हा एकदा मनसे भाजप युती होण्याच्या चर्चासुरु झाल्या आहेत..या चर्चांचं कारण ठरलं आहे ते म्हणजे भाजप नेते आशिष शेलार आणि मनसे अध्यक्ष यांची झालेली भेट…
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांच्यात आज सकाळी सुमारे एक तास चर्चा झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. राज ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या शिवतिर्थावर या दोन्ही नेत्यांत भेट झाल्याची माहिती समोर आली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या भेटीमुळे चांगल्याच चर्चा रंगल्या आहेत. त्यामुळं मनसे महायुतीत सामील होणार का असा प्रश्न अनेकांना पडला आहे. तशा चर्चा देखील सुरु झाल्या आहेत.भाजप नेते आशिष शेलार यांनी घेतली मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये शिवतीर्थावर जवळपास एक तास चर्चा झाली. यामुळे भाजप आणि मनसेमध्ये युती होण्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. दोन्ही नेत्यांमध्ये मनसे आणि भाजपमध्ये हातमिळवणी करण्यासाठीची चर्चा झाल्याची शक्यता राजकीय वर्तुळात सुरु आहे.मात्र या दोन्ही नेत्यांच्या भेटीमागचं खरं कारण अद्याप समोर आलेलं नाही.
मागील काही दिवसांपासून मनसे महायुतीत सामील होणार अशी चर्चा रंगली आहे, अशातच आता पुन्हा एकदा राज ठाकरे यांनी आशीष शेलार यांची भेट झाल्याने मनसे-भाजप युतींच्या चर्चांनी जोर धरला आहे. काही दिवसांपूर्वी मनसेचे नेते देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांना भेटले होते, त्यात आज पुन्हा राज ठाकरे आणि आशीष शेलार यांची भेट झाली आहे.महत्त्वाचं म्हणजे राज ठाकरे यांना दिल्लीतून बोलावलं जाण्याची चर्चाही राजकीय वर्तुळात आहे. आगामा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या पक्षश्रेष्ठींकडून राज ठाकरे यांना दिल्ली दरबारी बोलवणं येण्याची शक्यता सध्या वर्तवली जात आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंसोबत चर्चा करून भाजप त्यांनासोबत घेण्याचा प्रस्ताव ठेऊ शकते, असंही बोललं जात आहे.आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हि भेट महत्वाची आहे. त्यामुळं मनसे भाजप युती होणार का ? याचं चित्र येत्या काळात स्पष्ट होईल.