मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या लढाईसाठी जालना जिल्ह्यात अंतरवली सराटी येथे २९ ऑगस्ट २०२३ रोजी उपोषण सुरु केले त्या दिवसापासून ते आजपर्यंत मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरु असलेल्या मराठा आरक्षण लढ्यात अनेक चढ उतार सुरु आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले त्यानंतर राजकीय वातावरण तापल्याचं पाहायला मिळालं. अधिवेशनात देखील सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात चांगलीच खडाजंगी झाली..विधानसभा अध्यक्षांनी मनोज जरांगे पाटील यांच्या आरोपांवरील चौकशीसाठी एसआयटी स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. हिंसा अथवा हिसंक वक्तव्य याला लोकशाहीत स्थान नाही. यासाठी योग्य उपाय योजना करण्याची जबाबदारी शासनाची आहे. याच गांभीर्य लक्षात घेत शासनाने याची सखोल एसआयटी चौकशी करावी, असं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी म्हटलं आहे.
अधिवेशनात मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर बोलताना भाजप नेते अशिष शेलार यांनी विधानसभेत म्हटलं की, कोपर्डी केसमधील आरोपींना कोर्टाच्या आवारात जाऊन मार हे सांगितलं आम्हाला असा आरोप आहे. पिस्तुल कोणाकडे सापडली, लोकप्रतिनीधींची घरं जाळली, याची चौकशी नको का, असा सवाल शेलार यांनी उपस्थित केला. यासोबत एसआयटी लावा, अशी मागणीही केली. याच्या मागे या सभागृहातील सदस्य कोण आहे याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी अमित साटम यांनीही केली…
दरम्यान या सगळ्या प्रकरणावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यांदाच मनोज जरांगे पाटील यांच्यावर प्रतिक्रिया दिली आहे. ”मला बोलायचं नव्हतं. मराठा समाजच्या संदर्भात मी काय केलं हे महाराष्ट्राला माहीत आहे. मी मुख्यमंत्री असताना आरक्षण दिल ते हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टात टिकवलं, सारथीला निधी शिष्यवृत्ती दिली, कर्ज दिले. मराठा समाज्यातल्या संदर्भात मला कोणाच्याही सर्टिफिकेटची गरज नाही. जरांगे पाटील माझ्यावर बोलले त्यानंतर मराठा समाज माझ्या पाठीशी उभा राहिला, त्यांच्यापाठीशी नाही’, असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं आहे.
शिवाजी महाराजांचं नाव घ्याचचं आणि दुसऱ्यांना शिव्या द्यायच्या. लाठीचार्जच्या आधी मनोज जरांगे यांना परत कोणी आणलं, त्यांना घरी कोणं भेटलं, हे शोधायला हवं असं फडणवीसांनी म्हटलं आहे. आरोपी सांगत आहे की, दगडफेक करायला कोणी सांगितले. पोलीस आपले नाहीत का? समाजाला विघटीत करण्याचा प्रयत्न होतोय. त्यांना पैसे कोण देतेय, त्यांना मदत कोण करतंय, हे सर्व बाहेर येईल, असं फडणवीसांनी म्हटलं आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिक्रियेनंतर जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीसांना प्रत्युत्तर दिलं आहे.. जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे की.. देवेंद्र फडणवीस हे आशिष शेलार यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळी चालवणार आहेत. मी कुठेच चुकीचा नाही आणि कुठेच गुंतू शकत नाही. मला सगळ्यात जास्त फोन तुमचेच आले असून, फेस कॉलवर काय काय बोललेत मी पण उघड करतो, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. मी मराठ्यांचे काम करतोय. ते सत्तेचा वापर करणार आहे. देवेंद्र फडणवीस हे आशिष शेलार यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळी चालवणार आहेत. न्यायचं त्या तुरुंगात घेऊन जा, चौकशी लावा. मला सगळ्यात जास्त फोन तुमचेच आले आहेत असंही जरांगे म्हणाले आहेत.