येत्या काही दिवसात संपूर्ण देशात लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. मार्चमध्ये लोकसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता जाहीर केली जाणार असल्याचं बोललं जातंय… म्हणजेच अवघ्या काही दिवसांवर लोकसभेची निवडणूक येऊन ठेपलीय. यामुळं आता सगळीकडेच राजकीय घमासानाला सुरुवात होऊ लागली आहे.. अशात फार बेरकी आणि नात्या-गोत्यांचं राजकारण म्हणून ओळख असलेल्या अहमदनगरमध्ये मात्र दररोज काही ना काही नवीन राजकीय घडामोड घडत आहे. नगर दक्षिण सोबत आता नगर उत्तरमधील राजकीय वातावरण ढवळून निघू लागलं आहे.. याचं कारण म्हणजे कोल्हे विरुद्ध विखे संघर्ष अधिक विकोपाला गेला असून नगर जिल्ह्यात भारतीय जनता पार्टी विरुद्ध विखे जनता पार्टी अशीच लढाई राहील आणि जर राज्यातील पक्षश्रेष्ठींनी यात लक्ष घातलं नाही तर नगर जिल्ह्यात भाजप अधोगतीलाच जाणार असल्याचा इशारा विवेक कोल्हे यांनी दिला आहे… त्यामुळं आता स्वःपक्षातूनच राधाकृष्ण विखे पाटील यांना कडवी टक्कर देणारे हे विवेक कोल्हे नेमके आहेत तरी कोण ? हा कोल्हे विरुद्ध विखे संघर्ष नेमका काय आहे तो विकोपाला का जाऊन पोहोचलाय आणि याचा नगर उत्तरमध्ये भाजपला कसा फटका बसू शकतो ? या व्हिडिओतून जाणून घेऊयात…
विवेक कोल्हे यांनी थेट विखेंच्या विरोधात दंड थोपटले आहेत.विवेक कोल्हे राधाकृष्ण विखें पाटलांच्या मतदारसंघात विखेंच्या विरोधात निवडणूक लढणार असल्याची चर्चा सुरू आहे. स्वः पक्षातून मिळणाऱ्या या आव्हानामुळे उत्तर नगरमध्ये विखेंच्या वर्चस्वाला सुरुंग लागणार असल्याची देखील चर्चा सुरु झाली आहे.. राधाकृष्ण विखे पाटील नगर जिल्ह्याची सूत्रं कायम आपल्या हाती ठेवण्याच्या प्रयत्नांत असल्याचं बोललं जातं.त्यामुळं येणाऱ्या काळात नगर भाजपातून विखेंवर नाराज असलेले सर्व नेते एकवटून त्यांच्याविरोधात लढण्याची शक्यता नाकारता येत नाही.. आणि याचा परिणाम म्हणून पुन्हा एकदा नगर जिल्ह्यातून भाजपाला धक्का बसू शकतो.या अंर्तगत कलहावर भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कसा तोडगा काढणार हे येत्या काळात स्पष्ट होईल.