पुणे | लायन्स क्लब इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 3234 डी2 च्या वतीने प्रांतपाल लायन विजय भंडारी यांच्या तिसऱ्या मन की बात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विविध स्पेशल लायन्स क्लब स्थापन करून अधिकाधिक सामाजिक कार्य घडवून आणणे आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी उपक्रम राबवण्याबरोबरच इतर अनेक महत्वपूर्ण विषयांवर मंथन करण्यात आले. लायन्स क्लब इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 3234 डी2चे प्रांतपाल लायन विजय भंडारी यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम कोथरूड मधील हर्षल हॉल येथे संपन्न झाला.
प्रांतपाल लायन विजय भंडारी यांच्यासह पीएसटी कॉनटेस्ट विजेत्या नऊ लायन सदस्यांनी विविध विषयांवर आपले मत मांडले. प्रांतपाल लायन विजय भंडारी यांच्या मन की बात या कार्यक्रमानंतर गेल्या तीन महिन्यांत डिस्ट्रिक्ट ३२३४ डी२ मधील विविध लायन्स क्लबच्या वतीने आयोजित केलेल्या समाजोपयोगी उपक्रमांचा कौतुक सोहळा पार पडला. यावेळी प्रत्येक रिजन मधील प्रत्येकी 3 क्लब्सला पारितोषिके देऊन क्लबचे अध्यक्ष, झोन चेअरपर्सन, व रिजन चेअरपर्सन यांचे अभिनंदन करण्यात आले. लायन्स क्लबच्या परंपरेनुसार फेब्रुवारी महिन्यात माजी प्रांतपालांचा सन्मान केला जातो. हीच परंपरा जपत इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 3234 डी2चे प्रांतपाल लायन विजय भंडारी यांच्या हस्ते सर्व माजी प्रांतपाल यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी सन्मान स्वीकारताना सर्व माजी प्रांतपाल यांनी वर्तमान प्रांतपाल लायन विजय भंडारी व त्यांच्या टीमचं भरभरून कोतुक करीत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. विशेष म्हणजे फेब्रुवारी महिन्यात लायन्स सखी मंचतर्फे लायन्य लेडिज प्रिमिअर लीगच्या यशस्वी आयोजनाबद्दल फर्स्ट लेडी ऑफ डिस्ट्रिक्ट आणि सखी मंचच्या अध्यक्षा लायन भारती भंडारी, प्रियांका परमार आणि लायन प्रिती बोंडे यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमावेळी डिस्ट्रिक्टचे सीईओ लायन श्याम खंडेलवाल, सचिव लायन अशोक मिस्त्री, खजिनदार लायन राजेंद्र गोयल, गेत को-ऑरडिनेटर लायन सुनील चेकर, जीएसटी को-ऑरडिनेटर लायन आनंद आंबेकर, माजी प्रांतपाल, लायन्स क्लब इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 3234 डी2 मधील रिजन चेअरपर्सन, झोन चेअरपर्सनव क्लब्जचे लायन सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
“गेल्या काही महिन्यांमध्ये लायन्स क्लब इंटरनॅशन डिस्ट्रिक्ट 3234डी2 मधील सर्व लायन्स क्लबने विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवला. विशेष करून डिस्ट्रिक्टमधील प्रत्येक क्लबला भेट देत असताना क्लबच्या सदस्यांनी घरातील सदस्याप्रमाणे पाहुणचार केला. आजवरच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या प्रांतपालाने 87 लायन्स क्लबला भेटी दिल्या आहेत. लायन्स क्लबप्रमाणेच सखी मंच सुद्धा उत्कृष्ट उपक्रम राबवत आहे. आगामी काळात चांगले काम करण्यासाठी सर्व लायन्स सदस्यांनी आपले मोलाचे योगदान देत रहावे.
–लायन विजय भंडारी (प्रांतपाल, लायन्स क्लब इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 3234 डी2)