नागपूर | येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात नागपूर लोकसभा मतदार संघ हा अत्यंत महत्वाचा मानला जातोय…त्याचं कारण म्हणजे देशभरात लोकप्रिय असलेले केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना भाजपने पुन्हा तिसऱ्यांदा नागपुरातनं उमेदवारी जाहीर केलीय…अशातच आता त्यांच्या विरोधात काँग्रेसकडून कोण उमेदवार असणार यावरही जवळपास शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आहे. गडकरी यांना टक्कर देण्यासाठी महाविकास आघाडीचा हा उमेदवार नक्की कोण आहे याचविषयी आपण खालील व्हिडीओतून जाणून घ्या…
नागपूर मतदारसंघ हा काँग्रेसचा परंपरागत बालेकिल्ला आहे. 1998 पासून लागोपाठ चारवेळा काँग्रेसचे विलास मुत्तेमवार नागपुरात खासदार म्हणून विजयी झाले. 2009 मध्ये मुत्तेमवारांनी भाजपचे माजी खासदार बनवारीलाल पुरोहितांना 24,399 मतांनी हरवलं होत. मात्र २०१४ च्या मोदी लाटेत इथली फासे पलटले. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपकडून नितीन गडकरी मैदानात उतरले आणि त्यांनी मुत्तेमवारांना तब्बल 2,84,848 मतांनी पराभूत केलं. २०१९ मध्ये पुन्हा भाजपचे गडकरींना उमेदवारी दिली तेव्हा मात्र सध्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे त्यांच्या विरोधात उभा होते त्यावेळी गडकरींना 6,60,221 मत मिळाली तर पटोले यांना 4,44,212 मते मिळवता आली. 2, 16, 009 फरकाने नितीन गडकरी विजयी झाले होते…
आता येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी नितीन गडकरी विजयाच्या हॅट्रिकसाठी सज्ज झालेत. असं असताना त्यांच्या विरोधात काँग्रेसकडून शहराध्यक्ष आमदार विकास ठाकरे यांचं नाव आघाडीवर आहे. काँग्रेसच्या जेष्ठ नेत्यांच्या हस्तक्षेपानंतर दिल्ली येथे झालेल्या काँग्रेसच्या वर्किंग कमिटीच्या बैठकीमध्ये नागपूर लोकसभेसाठी आमदार विकास ठाकरे यांच्या नावावर शिक्कमोर्तब झाला आहे मात्र याची अधिकृत घोषणा होणे बाकी आहे.
असं असले तरी विकास ठाकरे नागपूरची निवडणूक लढायला फारसे उत्सुक दिसत नाही…नागपूरच्या जेष्ठ नेत्यांनी मैदानात उतरायला हवे होतं, असं म्हणत विकास ठाकरे यांनी नाव न घेता नितीन राऊत, विलास मुत्तेमवार आणि सतीश चतुर्वेदी यांच्याकडे बोट दाखवलं. मी स्वतः पेक्षा दुसऱ्यासाठी मैदानात उतरायला तयार होतो. मात्र, शेवटी पक्षाने माझ्या नावाची घोषणा केल्यास मला पूर्ण ताकदीने मैदानात उतरावं लागेल, असं ठाकरे म्हणाले आहे त्यामुळे नागपूरमधून भाजपच्या तगड्या उमेदवाराला हरवण्याचं आव्हान विकास ठाकरे यांना पेलवेल का? त्यामुळे सततच्या बदलत्या राजकीय घडामोडीमध्ये ठाकरे यांच्याऐवजी आणखी कुणी गडकरींना आव्हान देणार हे येणाऱ्या दिवसात स्पष्ट होईल.