लोकसभेची निवडणूक १९ एप्रिलपासून १ जूनपर्यंत चालणार आहे. महाराष्ट्रात पाच तर देशात सात टप्प्यांत निवडणूक होणार आहे. या अनुषंगाने प्रचाराची रणधुमाळीही सुरु झाली आहे. अशात स्टार प्रचारक म्हणून एकनाथ शिंदे यांनी ४० नावं जाहीर केली आहेत. यामध्ये स्वतःच्या पक्षांच्या नेत्याऐवजी मित्र पक्ष्यांच्या नेत्यांचाच अधिक भरणा दिसत आहे. यामध्ये कोण कोण दिग्गज मंडळी शिंदेंच्या शिवसेनेचे स्टार प्रचारक आहेत. तेच या व्हिडिओतून जाणून घेऊयात…
काही दिवसांपूर्वी भारतीय जनता पक्षानं महाराष्ट्रातील त्यांच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली… त्यानंतर अजित पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानंही आपल्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली… आणि आता एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनंही आपल्या ४० स्टार प्रचारकांची नावं जाहीर केली आहेत.. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, रामदास आठवले, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल, राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर, पिपल्स रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष जोगेंद्र कवाडे यांच्यासह अनेक महत्त्वाची नावं या यादीत आहेत. परंतु ही सर्व नेते मंडळी मित्र पक्षांची आहेत… शिवसेनेतले नेतेही या स्टार प्रचारकांच्या यादीत आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदींसह ४० जणांची फौज महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या प्रचाराचा धुरळा उडवणार आहे. शिवसेनेतील बंडानंतर पहिल्यांदाच निवडणूक होत असल्याने उध्दव ठाकरे यांच्या बाजूने शिंदे आणि सहकाऱ्यांवर जोरदार प्रहार होणार आहेत. त्यामुळे त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी एकनाथ शिंदे आणि सहकारी देखील सज्ज असणार आहेत.