मविआ, महायुतीचं घोडं कुठं अडलं?
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी येत्या १० एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात प्रचाराला येणार असल्याची माहिती आहे.मात्र अद्याप काही जागांवरचा तिढा सुटलेला नाही.दक्षिण मुंबई, ठाणे, नाशिक, उत्तर पश्चिम मुंबई, हिंगोली, यवतमाळ-वाशिम अशा जवळपास सहा ते सात जागांसाठी महायुतीमधील शिवसेना आणि भाजप असे दोन्ही पक्ष आग्रही आहेत. तर, दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये ही तशीच परिस्थिती आहे. वडणुका जवळ आल्या तरी या सहा ते सात जागांवर उमेदवार का ठरत नाहीत.घोडं नेमकं अडलंय कुठं ? हेच आपण या व्हिडिओतून जाणून घेउयात…
महाविकास आघाडीमध्ये ठाकरे यांच्या शिवसेनेने सुरुवातीपासूनच कोल्हापूर किंवा सांगली अशा दोन जागांपैकी एका जागेसाठी आग्रह धरला होता. कोल्हापूर मतदारसंघ शाहू महाराज यांच्या रूपाने काँग्रेसकडे गेल्याने उद्धव ठाकरेंनी सांगलीमध्ये चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर करून टाकली. या जागेवर काँग्रेसने विशाल पाटील यांच्या उमेदवारीसाठी आग्रह धरला आहे. याशिवाय उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघासाठी काँग्रेसने संजय निरुपम यांच्यासाठी आग्रह धरला असताना उद्धव ठाकरेंनी तिथेही विद्यमान खासदार गजानन कीर्तिकर यांचे चिरंजीव अमोल कीर्तिकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
भाजपचे जळगाव लोकसभा मतदारसंघातील विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांची भाजपने उमेदवारी कापल्याने ते नाराज झाले आहेत. यामुळे त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला आहे…२०१९च्या लोकसभा निवडणुकीत भाजपकडून जाहीर झालेली स्मिता वाघ यांची उमेदवारी रद्द करून उन्मेष पाटलांना जळगाव लोकसभेची उमेदवारी ऐनवेळी देण्यात आली होती. साडेचार लाखांच्या मताधिक्याने त्यांनी माजी मंत्री व राष्ट्रवादीचे उमेदवार गुलाबराव देवकरांचा पराभव केला होता. पाच वर्षांत खासदार म्हणून आपले काम चांगले असूनही उमेदवारी कापल्याच्या नाराजीतून ते ठाकरेंच्या शिवसनेत गेले आहेत…त्यामुळे जळगाव मध्ये त्यांच्या नाराजीचा फटका भाजपला बसण्याची शक्यता वर्तवली जाते.