वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीपासून फारकत घेत एकला चलो रे भूमिका घेतली आणि अनेक ठिकाणी आपले उमेदवार उभा केले. २०१९ च्या निवडणुकीत भरघोस मतं घेतलेल्या उमेदवारांना डावलून यावेळी त्यांनी नव्या चेहऱ्यांना संधी दिली..सर्व जाती-धर्मातील प्रतिनिधींना निवडणुकीच्या मैदानात संधी देण्याचं काम वंचित आणि प्रकाश आंबेडकरांकडून केलं जातंय. मात्र काही मतदारसंघात उमेदवार बदलण्याची तर काही ठिकाणी इतर पक्षांना पाठिंबा देण्याची नामुष्की वंचितवर ओढवली आहे. त्यामुळं अगदी उमेदवाराच्या जातीसह त्याच्या नावाची घोषणा करणाऱ्या वंचित पॅटर्नचं गणित नेमकं कुठं चुकतंय? हेच आपण या व्हिडिओतून पाहुयात.
वंचितकडून 2024च्या लोकसभा निवडणुकासाठी आतापर्यंत जवळपास 35 मतदारसंघात उमेदवारांची घोषणा करण्यात आली तर सहा ठिकाणी इतर उमेदवाराला पाठिंबा देण्यात आला. मात्र.. उमेदवारांनी घेतलेली माघार आणि बदललेल्या उमेदवारांमुळं वंचितचं नक्की चाललंय काय? यावरुन प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.वंचितवर बी टीम असल्याचे आरोप देखील सोशल मीडियातून केले जात आहेत. यावर प्रकाश आंबेडकर यांच्यासह वंचितकडून देखील उत्तर दिली जात आहेत.
अकोल्यात स्वतः प्रकाश आंबेडकरांसह राज्यातील इतर उमेदवारांसाठीही वंचित बहुजन आघाडी आक्रमकपणे मैदानात उतरलेली पाहायला मिळत आहे.असं असलं तरी उमेदवारांनी घेतलेली माघार आणि बदललेल्या उमेदवारांमुळे निवडणुकीत काही फरक पडणार का हे पाहावं लागेल.यासह चार जूनला वंचितची नेमकी ताकद कितीय हे देखील स्पष्ट होईल.