नाशिक। कुंभनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिक लोकसभा मतदारसंघात स्वामी शांतिगिरी महाराजांची अपक्ष उमेदवारी विविध कारणांनी चर्चेत आहे.धर्मरक्षणासाठी धर्मयोद्धा संघटनेची स्थापना करणाऱ्या महाराजांमुळे हिंदुत्ववादी मतांचं विभाजन अटळ मानलं जात आहे.. हे विभाजन टाळण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह भाजप नेत्यांनी प्रयत्न केले पण ते फेल ठरले. कारण शांतिगिरी महाराजांनी आपली उमेदवारी मागे घेतली नाही.त्यामुळे नाशिकमध्ये तिहेरी सामना रंगतोय.दोन शिवसैनिक एकमेकांविरोधात लढत आहेत. महायुतीतून एकनाथ शिंदे यांच्या शिवसनेकडून हेमंत गोडसे तर महाविकास आघाडीतून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे राजाभाऊ वाजे रिंगणात आहे. पण या दोघांच्याही अडचणी वाढवल्या आहेत त्या शांतिगिरी महाराज यांनी.. त्या नेमक्या कश्या हेच आपण या व्हिडिओतून पाहू…
भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या दावेदारीमुळे महायुतीत वादाच्या भोवऱ्यात सापडलेली नाशिक लोकसभेची जागा अखेरच्या क्षणी शिंदेसेनेला मिळाली. प्रचारास फारसा कालावधी राहिला नसल्याने एकनाथ शिंदे यांनी नव्या चेहऱ्याचा विचार न करता भाजपने विरोध केलेले विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांना मैदानात उतरवलं. उशिरा उमेदवारी जाहीर झाल्यामुळे प्रचारासाठी हेमंत गोडसे रात्रंदिवस एक करत असल्याचं दिसत आहे पण मित्रपक्षांकडून हवं तसं सहकार्य मिळत नसल्याची त्यांच्यापुढे अडचण आहे.आणि हीच गोष्ट राजाभाऊ वाजे यांच्या पथ्यावर पडत असल्याने या लढतीला वेगळाच रंग आला आहे.
वादाच्या भोवऱ्यात सापडलेली नाशिकची जागा महायुतीतील कुठल्याही पक्षाला मिळाली तरी त्या पक्षाकडून अर्ज भरण्याची शांतिगिरी महाराजांची तयारी होती. पण तसं झालं नाही.आता ते अपक्ष उभा असल्यामुळे हेमंत गोडसे आणि राजाभाऊ वाजे या दोघांनाही कसा फटका बसू शकतो तर महाराजांच्या जय बाबाजी परिवारात ग्रामीण भागातील मंडळींचा भरणा मोठ्या प्रमाणावर असल्याने महाराज दोघांच्या मतांमध्ये वाटेकरी ठरतील. वंचित बहुजन आघाडीने मराठा समाजाचे करण गायकर यांना उमेदवारी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पिंपळगाव येथील आणि उध्दव ठाकरे यांच्या नाशिक मधील सभेला झालेली गर्दी तोडीस तोड असल्याने या सभांमध्ये झालेली कोणाची गर्दी मतांमध्ये अधिक रुपांतरित होईल, हा घटकही निकालावर परिणामकारक ठरणारा आहे. मागील दोन पंचवार्षिकांमध्ये झालेली मराठा विरुध्द ओबीसी अशी लढत न होता यावेळी महायुती आणि मविआकडून मराठा समाजाचे उमेदवार मैदानात आहेत. अशावेळी ओबीसी समाज कोणाला साथ देईल, यावर निकाल अवलंबून राहील.