सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. अशा परिस्थितीत विरोधक आणि सत्ताधारी एकमेकांवर जोरदार हल्लाबोल करताना पहायला मिळतात. देशभरात सध्या विकास किंवा अन्य मुद्द्यांवर निवडणूक सुरू असली तरीही महाराष्ट्रात अजूनही निष्ठेचा मुद्दा महत्त्वाचा दिसतोय. यामध्ये गेल्या अडीच वर्षात महाराषट्रात फुटलेले दोन प्रादेशिक पक्ष हाच मुद्दा निवडणुकीच्या केंद्रस्थानी आहे. यामुद्द्यावरून रोज नवनवीन गौप्यस्फोट होत असतात. असाच एक गौप्यस्फोट सध्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलाय टीव्ही 9 मराठी या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केलाय.
2019 साली विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेना एकक्त्रित लढले. निवडणुकीवेळी भाजपनं आपल्याला अडीच वर्षाचं मुख्यमंत्रीपद देण्याचं आश्वासन केलं होतं असं सांगत उद्धव ठाकरे युतीतून बाहेर पडले आणि राज्यात महाविकासआघाडीचं सरकार स्थापन झालं. मात्र, या सगळ्या परिस्थितीत भआजपनं उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाचा शब्द दिला नव्हता असा पुनरुच्चार देवेंद्र फडणवीसांनी यावेळी बोलताना केला. सोबतंच उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचं 2019च्या विधानसभा निवडणुकीपूर्वीच डील झालंं होतं असा आरोप देवेंद्र फडणवीसांनी यावेळी केला.
देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
2019च्या विधानसभा निवडणुकीवेळी भाजपनं शिवसेनेला दिलेला शब्द पाळला नाही असा यारोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे वारंवार करतात. याच आशयाच्या प्रश्नावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदाचा कोणताही शब्द दिला नव्हता. याशिवाय त्यांना सत्तेतील मंत्रीपदं वाढवून देण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं. मात्र, 2019च्या विधानसभा निवडणुकीपूर्वीच उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात राजकीय डील झालं होतं. भाजप स्वबळावर निवडणुकीला सामोरे गेली तर एकहाती सत्ता स्थापन करू शकते याचा अंदाज शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना दिला आणि त्यामुळेच उद्धव ठाकरेंनी आमच्याशी युती केली आणि निकालानंतर मविआसोबत सरकार स्थापन केलं.”