मनोज जरांगे आक्रमक
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षण मागणी बाबत गेल्या अनेक महिन्यांपासून आक्रमक आहेत. दरम्यान आज मनोज जरांगे यांनी माध्यमांशी संवाद साधला असता ते म्हणाले, राजकारणात आता उतरलो नाही मात्र आरक्षण मिळाले नाही तर विधानसभेला पूर्ण ताकतीने संपूर्ण मराठा समाज मैदानात उतरेल. आता नाव घेतलं नाही मात्र त्यावेळेस नाव घेऊन भूमिका मांडेल.यावेळेस फक्त पाडा म्हणलो नाव घेतलं नाही विधानसभेच्या वेळेस नाव घ्यावं लागेल, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. तसेच आता माझी तब्बेत बरी आहे, काळजी करायची गरज नाही, असंही त्यांनी म्हटलं आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले, पाच टप्प्यात निवडणूक पार पडत आहे. मी कुणालाही पाठिंबा दिलेला नाही. तुम्हाला वाटेल त्याला तुम्ही मत द्या.नाशिकमध्ये पण मी कुणालाच पाठिंबा दिला नाही बाकी अफवा पसरत आहे. आपण पाठिंबा देणार नाही आणि दिलेला पण नाही. सर्वांनी विनंती आहे भावनिक होऊ नका. आपल्या लेकरांच्या बाजूने उभे राहा. आपल्या हिताचे कोण बोलतो त्याच्या पाठीशी उभे राहा. आपल्या लेकरांना न्याय मिळवून देईल त्याला मत द्या. जो मदत करेल त्याला मत द्या. आपल्याला दिलेला त्रास विसरू नका. हे पाया पडतील आणि पुन्हा विसरून जातील.मातांमधून आपली ताकद दाखवा.बीडमधील नारायण गडावर होणारी सभा रद्द झाली कारण तिथे तयारी नव्हती. सर्वांचे हाल झाले असते. पुन्हा यापेक्षा ताकदीने मोठी सभा करू. तिथे अडचणी आहे त्यामुळे नागरिकांचे हाल झाले असते, असं मनोज जरांगे म्हणाले.
पुढे बोलताना ते म्हणाले, मराठ्यांनी जातीवाद केला नाही.सुरुवात केली नाही. मला काही म्हणाले शहाणपणाची भूमिका घ्या. मी सर्व समाजाला सांगतो त्यांच्यावरची वेळ गेली आहे. त्यांना भांडण लावायचे आहे. समाजाला अन्याय सहन होत नाही म्हणून हे सुरू आहे. मात्र समाजाने शांत राहावे. प्रत्यक्ष जाणूनबुजून त्रास दिला जातोय का? यावर बारकाईने लक्ष ठेवा. ते मुद्दाम असे उद्योग करणार आहेत. त्यामुळे कोण काय करतोय त्यावर बारकाईने लक्ष ठेवा. नेत्यांचे भागून गेले आहे त्यामुळे ते आता काहीही करतील.एकत्र या एका ताकदीने पाडा असंही मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे.