मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी आज सरकारचं शिष्टमंडळ आलं होतं. राज्याचे उत्पादन शुल्क विभागाचे मंत्री शंभूराज देसाई, भाजपचे आमदार राणाजगजित सिंह पाटील आणि छत्रपती संभाजी नगरचे नवनिर्वाचित खासदार संदिपान भूमरे या शिष्टमंडळात होते. या शिष्टमंडळाने जरांगे पाटलांनी यशस्वी मनधरणी केली आहे. त्यानंतर जरांगे पाटलांनी पाणी पिऊन उपोषणाला स्थगिती दिली.
यावेळी मनोज जरांगे यांनी पाच मागण्या मांडल्या.
पहिली मागणी केली ती आम्ही दिलेली सगे सोयरेची व्याख्या असायला पाहिजे. सगे सोयरे कायद्याची अंमलबजावणी करा.
दुसरी मागणी केली आता 57/ 63 लाख नोंदींचा आधार मिळाला आहे.
तिसऱ्या मागणीत हैदराबादचे गॅझेटचा आधार घ्यायला सांगितला आहे.
चौथी मागणी अंतरावली सराटीसह राज्यातील गुन्हे मागे घ्यावेत.
पाचवी मागणी शिंदे समिती रद्द न करता, 24 तास सुरू ठेवावीत.
या मागण्या मांडत जरांगे म्हणाले की, आम्ही तुम्हाला पाच महिने वेळ दिलेला आहे. त्यातले 2 महिने आचारसंहितेत गेले. आता आम्ही तुम्हाला 30 जून पर्यंत वेळ देतो, असे जरांगेंनी म्हणाले.पण शंभू राजे देसाई यांनी 1 महिन्याचा अवधी मांगितला. जरांगेंनी यावर जर तुम्ही 1 महिन्यात आरक्षण दिलं नाही तर आम्ही निवडणुकीत उतरणार आणि 288 विधानसभेत सगळ्या सीट पाडणार असल्याचा इशारा जरांगे पाटलांनी दिला. आजच्या तारखेपासून 1 महिन्यात जर आरक्षण दिलं नाही तर मी कोणाचच ऐकणार नाही. मी निवडणुकीची चळवळ सुरूच ठेवणार. 13 जुलै पर्यंत सरकारला वेळ दिला. 14 जुलैला मी कोणाचंच ऐकणार नाही, असा इशाराच जरांगेनी सत्ताधाऱ्यांना दिला आहे.