राज्यसभेतील दहा खासदार लोकसभेवर निवडून गेल्याने वरिष्ठ सभागृहातील दहा जागा रिक्त झाल्या आहेत.महाराष्ट्र,आसाम आणि बिहार मधील प्रत्येकी दोन जागा तर हरियाणा, मध्यप्रदेश,राजस्थान आणि त्रिपुरा या राज्यांमधील प्रत्येकी एक जागा रिक्त झाली आहे..यामध्ये महाराष्ट्रातून पियुष गोयल आणि उदयनराजे भोसले यांचा समावेश आहे.महाराष्ट्रातून राज्यसभेवर निवडून गेलेले आणि वरिष्ठ सभागृहाचे सभागृह नेते असेलेले पियुष गोयल यांनी उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून तर उदयनराजे भोसले यांनी सातारा लोकसभा मतदारसंघातून विजय मिळवल्याने महाराष्ट्रातील या दोन जागा रिक्त झाल्या आहेत.. या दोन्ही जागा भाजपच्या कोट्यातील आहेत.त्यामुळे या रिक्त झालेल्या दोन्ही जागा भाजप स्वत:कडे कायम ठेवणार की मित्रपक्षांना सोडणार ? या जागांसाठी कोणाची संभाव्य नावं चर्चेत आहेत.हे आपण या व्हिडिओतून पाहू..
राज्यसभेचा खासदार किंवा विधान परिषदेचा आमदार लोकसभा वा विधानसभेवर निवडून गेल्यास त्याचे सदस्यत्व आपोआपच रद्द होते. त्यांना राजीनामा द्यावा लागत नाही. लोकसभा किंवा दुसऱ्या सभागृहात निवडून आल्याचे जाहीर झाल्यापासून त्यांची राज्यसभेची खासदारकी वा विधान परिषदेची आमदारकी तात्काळ रद्द होते. एखादा राज्यसभेचा खासदार राज्यसभेवर निवडून आल्यास त्याचं राज्यसभेचंं सदस्यत्वपद आपोआप रद्द होण्याची कायद्यात तरतूद आहे. या लोकसभा निवडणुकीत पियूष गोयल आणि उदयनराजे भोसले हे राज्यातील दोन राज्यसभेचे खासदार अनुक्रमे उत्तर मुंबई आणि सातारा मतदारसंघातून निवडून आले आहेत. यामुळे दोघांची राज्यसभेची खासदारकी आता संपुष्टात आलीय. दोन्ही जागांसाठी लवकरच पोटनिवडणूक होईल. पोटनिवडणुकीत प्रत्येक जागा ही स्वतंत्र मानली जाते.यामुळ दोन जागांसाठी वेगवेगळी निवडणूक होईल.आता लोकसभेच्या जागावाटपात महायुतीमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या वाट्याला चारच जागा आल्या होत्या. त्यामुळे पियुष गोयल यांची रिक्त होणारी जागा आम्हाला देण्याचा शब्द भाजप नेतृत्वाने दिला असल्याचा दावा राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी केला होता. यानुसार भाजप ही जागा राष्ट्रवादीला देणार का, हा प्रश्न आहे. कारण लोकसभा निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा दारुण पराभव झाल्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप राष्ट्रवादीला फारसं महत्त्व देईल का याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. यामुळेच आणखी चार वर्षे मुदत असलेली गोयल यांची जागा भाजप राष्ट्रवादीला सोडण्याबाबत साशंकता आहे.तर राज्यसभेच्या दोन्ही रिक्त जागांबाबत दिल्लीच्या पातळीवरच निर्णय होईल, असं भाजपच्या नेत्यांकडून स्पष्ट करण्यात आलंय.
त्यामुळे या जागांवर कोणाला संधी दिली जाणार? याबाबत काही नावांची चर्चा आहे..चर्चेतील पहिलं नाव आहे ते पंकजा मुंडे यांचं.भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांचा लोकसभेत पराभव झाला.त्यांचा हा पराभव सहन न झाल्याने त्यांच्या अनेक कार्यकर्त्यांनी आत्महत्या केली आहे. मुंडे पराभूत झाल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये निराशा पसरली आहे. त्यामुळे पंकजा मुंडे यांच्या राजकीय पुनर्वसनाचा मुद्दा उपस्थित होऊ लागल्याने आष्टीचे आमदार सुरेश धस यांनी पंकजा मुंडे यांचं पुनर्वसन करण्याची मागणी केली आहे. पंकजा मुंडे यांना राज्यसभेवर घेतलं जावं आणि हा निर्णय तातडीने घ्यावा असा आग्रहच सुरेश धस यांनी धरला आहे.त्यामुळे पंकजा मुंडे यांना राज्यसभेवर घेतलं जाणार का हे पाहावं लागेल.पंकजा मुंडे यांच्यासोबतच लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेले दक्षिण अहमदनगर लोकसभा मतदार संघातील भाजपाचे उमेदवार डॉ सुजय विखे पाटील, माढा लोकसभेतील उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर… तसेच, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतून नाशिकमधून लढलेले हेमंत गोडसे, दक्षिण मध्य मुंबईतून लढलेले राहुल शेवाळे, जालन्यातील अर्जुन खोतकर या नावांचीही चर्चा सुरु आहे.केंद्रीय मंत्रीमंडळात कोकण आणि मराठवाडाला संधी मिळालेली नाही. त्यामुळे प्रादेशिक समतोल साधण्यासाठी या दोन विभागातून भाजपकडून कोणाला संधी दिली जाईल याची उत्सुकता आहे.