मराठा आरक्षण आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील यांनी आज छत्रपती संभाजीनगर येथे रुग्णालयातून पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी राज्य सरकारला मोठा इशारा दिला आहे.आगामी विधानसभा निवडणुकीत राज्य सरकारच्या 9 मंत्र्यांना पाडणार, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे. “बरं वाटत नसल्याने पुन्हा इथं आलो. एकत्रित टोळी येऊन घाला घालत असेल तर काय बोलावे? ते नेते तुटून पडले. आमचं बळकावू पाहताय, मराठ्यांच्या नेत्यांची मस्ती इथं उतरेल. येवला वाला लै दिवसाचा म्हणतोय नोंदी रद्द करा म्हणून आणि त्यांची टोळी आहे, आता रद्द करा म्हणतात. आता मंडल कमिशनने 14 टक्के आरक्षण दिले आहे. त्यापुढचे सगळे रद्द करा आणि ते 14 टक्के ही रद्द करा ही आमची मागणी आहे. आता करणार का पूर्ण?”, असा सवाल मनोज जरांगे यांनी केला.
मराठ्यांच्या सापडलेल्या नोंदी रद्द करा म्हणताय ते आता कळलं का सरकार पूरस्कृत आंदोलन आहे की नाही? आता तर बघा काय सुरुय, मराठ्या नेत्यांनी डोळे उघडा आता. शेकडो वर्षांच्या नोंदी रद्द करा म्हणतात ही लोकं. 70 वर्ष खोटं बोगस आरक्षण खाताय, तरी मराठा म्हणत नाहीत, या नोंदी रद्द करा म्हणून आणि आज गरीब मराठ्यांच्या पोरला मिळतंय तर यांची आग होतेय”, अशी टीका मनोज जरांगे यांनी केली. नियत, द्वेष यांची उघडी पडली बघा. बघा कोण किती जातीयवादी आहे ते. सगळे ओबीसी नेते सुद्धा आता उघडे पडले. अजून वेळ आली नाही. ओबीसी बांधवांचे वाटोळं करायचं आमचा विचार नाही. पण लक्षात ठेवा मंडल कमिशन चॅलेंज होतो आणि रद्दही होतो”, असं जरांगे म्हणाले.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवलाय. अन्याय होऊ देणार की नाही, आमच्या ध्यानात आले. तुम्ही ओबीसी नेत्यांच्या दबावाला पडून आमच्यावर अन्याय करणार असे दिसते. तुम्ही सरकार म्हणून फूस लावता. त्यांना आंदोलनासाठी तुम्हीच उभे करता, मी तुम्हाला डुबवल्याशिवाय राहणार नाही. तो येवलावाला चाब्रा आहे. त्याला राजकीय आयुष्यातून उठवेल. गाड्या पुरवितो. आमच्या आमच्यात लावून देतो. लढणाऱ्या लोकांनाही कळत नाही. त्यांना राज्यातील पडलेली गँग साथ देतेय. आता बघूला बघू उत्तर देऊ. आम्ही तिथं आंदोलन केले म्हणून तिथं उभा करतात का? तुम्ही आम्हाला खिंडीत पकडता, डाव साधता. मी 9 मंत्री पाडणार. 13 तारखेनंतर सांगतो”, असा मोठा इशारा मनोज जरांगे यांनी दिला.