लोकसभा निवडणुकीनंतर आता महाविकास आघाडीच्या नेत्यांचं लक्ष विधानसभा निवडणुकीकडे लागलं आहे.त्यासाठी मोर्चेबांधणीची सुरुवात करण्यात आली आहे.लोकसभेप्रमाणेच विधानसभा निवडणूक देखील तिन्ही पक्ष एकत्र लढणार आहेत..यानिवडणुकीत महाविकास आघाडीचा मुख्य चेहरा कोण याची चर्चा सुरु असतानाच मुख्यमंत्री पदाबाबत देखील चर्चा सुरु झाली आहे.त्यामुळे मुख्यमंत्री कोणाचा? कोणाचा चेहरा ठरेल? महाविकास आघाडीचं नेमकं काय ठरलं आहे? हे आपण या व्हिडिओतून जाणून घेउयात..
महाविकास आघाडीतील प्रमुख तीन पक्षांपैकी दोन पक्षांमध्ये उभी फूट पडल्यानंतरही महाराष्ट्रात मविआला घवघवीत यश मिळालं.त्यामुळे आत्मविश्वास वाढलेली मविआ आता जोमाने विधानसभेच्या तयारीला लागली आहे. अशातच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांच्या विधानावरून महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. उद्धव ठाकरे यांच्यामुळंच लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगली मतं मिळाली. त्यामुळं उद्धव ठाकरेंनाच मुख्यमंत्रीपदाचा चेहरा घोषित करायला हवं असं विधान संजय राऊत यांनी केलं. त्यानंतर आता मविआतील इतर घटक पक्षांच्या नेत्यांच्या याविषयीच्या भूमिकाही समोर येत आहेत. निवडणुकीआधी ‘मविआ’कडून मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर केला जाणार नसल्याची माहिती समोर आली आहे. नुकतीच महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांची दिल्लीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, लोकसभेचे विरोधीपक्ष नेते राहुल गांधी आणि काँग्रेस नेते यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीत काँग्रेस नेतृत्वाकडून आपल्याला आगामी महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढवायची असल्याचं राज्यातील काँग्रेस नेत्यांना सांगितलं..तसंच मुख्यमंत्रीपदाचा चेहरा आधीच दिला जाणार नाही. विधानसभेच्या निकालानंतर ज्याच्या जागा अधिक त्याचा मुख्यमंत्री हे काँग्रेसनं ठरवलंय. जुलै महिन्याच्या अखेरीस जागा वाटप पूर्ण व्हावं असं काँग्रेसच्या बैठकीत ठरलं आहे…काँग्रेस, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि ठाकरेंची शिवसेना अशा 3 पक्षांची महाविकास आघाडी आहे. मात्र मुख्यमंत्रिपदावरुन काँग्रेसनं भूमिका स्पष्ट केल्याची माहिती आहे, ज्याची संख्या अधिक त्या पक्षाचा मुख्यमंत्री असेल.