१२ जुलैला म्हणजेच उद्या विधानपरिषद निवडणूक होणार आहेत. यासाठी ११ जागांसाठी १२ उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये महायुतीचे एकूण ९ उमेदवार आहेत त्यापैकी भाजपाचे ५ शिवसेनेचे २ आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे २ उमेदवार आहेत. तर महाविकास आघाडीचे एकूण ३ उमेदवार आहेत. काँग्रेस कडून डॉ. प्रज्ञा सातव यांना उमेदवारी देण्यात आली आहे तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून मिलिंद नार्वेकर यांना उमेदवारी दिली आहे. शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाने पाठिंबा दिलाय. तर महायुती आणि महाविकास आघाडी पक्षाने क्रॉस वोटिंग होऊ नये याची खबरदारी म्हणून आपापल्या आमदारांना हॉटेलवर ठेवलय. १२ उमेदवारांपैकी कोणात्या उमेदवाराचा पराभव होण्याची शक्यता जास्त आहे यावरून राजकीय वर्तुळात चर्च्या रंगल्यात.
शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांनी शेकापचे आमदार जयंत पाटील यांची विकेट जाणार असल्याचं सांगितलं आहे. महाविकास आघाडीचा एक उमेदवार निवडून येईल. आमचा विजय निश्चित आहे असं ते म्हणाले. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आनंद परांजपे यांनी देखील निवडणुकीमध्ये महायुतीचे सर्व उमेदवार विजयी होतील असा विश्वास दर्शविला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार राजेश विटेकर आणि शिवाजी गर्जे हे पहिल्या फेरीतच विजयी होतील. पण महविकासआघाडीच्या तीन पैकी एकाचा पराजय निश्चित होणार आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर विजयी होऊ शकतात. त्यांचे सगळ्यांशी संबंध चांगले आहेत. शेतकरी कामगारा पक्षाचे उमेदवार जयंत पाटील यांचा पराभव होण्याची शक्यता आहे. जयंत पाटील यांचा हा पराभव राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा पराभव असेल असेही आनंद परांजपे यांनी म्हटले आहे. जर आपण मतांचे गणित बघितले तर महायुतीचे एकूण महायुतीचे एकूण २०२ आमदार असल्यानं महायुतीचे सर्व आमदार निवडून येतील असं चित्र दिसतंय. महाविकास आघाडीचे एकूण ६६ आमदार आहेत परंतु महाविकास आघाडीमध्ये क्रॉस वोटिंग झाल्यास महाविकास आघाडीचा १ उमेदवार पराभूत होऊ शकतो. परंतु बाकीच्या ६ आमदारांनी आपली तटस्थ भूमिका दर्शवली आहे. त्यामध्ये एमआयएमचे २ आमदार,समाजवादी पार्टीचे २आमदार, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचा एक आमदार आणि क्रांतीकारी शेतकरी पक्षाचा एक आमदार असे ६ आमदार तटस्थ आहेत. तसेच हे ६ तटस्थ आमदार कुणाला मतदान करणार यावरही निवडणुकीचं चित्रं अवलंबून असेल.