लोकसभा निवडणूक होऊन महिने गेले तरीसुद्धा महायुतीतील घटक पक्षात खटके उडत आहेत. लोकसभेला जागावाटपावरून काही मतदारसंघात महायुतीत वाद देखील झाला त्यातलंच एक उदाहरण म्हणजे अमरावती लोकसभा मतदारसंघ. अमरावती लोकसभा मतदारसंघातून नवीन राणा यांना उमेदवारी दिल्याने महायुतीमधील काही नेते नाराज होते. नाराज नेत्यांनी लोकसभेला नवनीत राणा यांना मदत देखील केली नाही. भाजपने आपली पूर्ण ताकद पणाला लावून देखील नवनीत राणा यांचा पराभव झाला. विधानसभा निवडणुकीपूर्वी देखील असाच वाद पुन्हा होऊ शकतो. अमरावती मध्ये महायुतीमध्ये वाद होण्याचं प्रमुख कारण म्हणजे राणा दाम्पत्य. शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी तर आता नवनीत राणा यांना आवरावं किंवा महायुतीमधून बाहेर काढावं असं म्हणत नाराजी व्यक्त केली.
शिवसेनेच्या नेत्यांनी नवनीत राणा यांना आवरावं किंवा त्यांना महायुतीतून बाहेर काढावं अशा शब्दांत उघड उघड नाराजी व्यक्त केली आहे.तसेच आम्हांला वेगळा निर्णय घ्यायला भाग पाडू नये असा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे. आनंदराव अडसूळ यांचे पुत्र यांनी देखील आता या प्रकरणात उडी घेतली आहे. अभिजीत अडसूळ यांनी ७ जुलैला माध्यमांशी बोलताना म्हणाले कि, राणा दाम्पत्यामुळे महायुतीत मिठाचा खडा पडत आहे. आमचा स्वाभिमान दुखावला तर आम्हीही शिवसैनिक आहोत हे लक्षात घ्या.शिवसेनेच्या नेत्यांचा अपमान सहन केला जाणार नाही. आमदार रवी राणा हे नेहमी वाचाळपणे बोलतात. लोकसभेला राणा यांनीच त्यांच्या पत्नीचा घात करून त्यांना पाडलं असल्याचं खळबळजनक दावाही त्यांनी केला. जिल्ह्यातील एकाही नेत्यासोबत त्यांचे चांगले संबंध नाही. महायुतीत खडा टाकण्याचं काम ते करत आहे.बनावट प्रमाणपत्र बनवून रवी राणा यांनी जनतेचा विश्वासघात केला,त्यामुळेच जनतेनेही त्यांना जागा दाखवल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. ज्यांची सत्ता असते तेच नेते राणा यांच्यासाठी देव असतात. बच्चू कडू हे देखील रवी राणांमुळेच महायुतीतून दूर गेलेत. राणांना महायुतीतून बाहेर काढा, अन्यथा आम्ही महायुतीत रहायचं का नाही हे तरी सांगा. ब्लॅकमेलिंग करणं हे आमच्या रक्तात नाही. बाळासाहेबांनी आम्हाला स्वाभिमानाने जगायला शिकवलं असल्याची स्पष्ट भूमिकाही त्यांनी यावेळी बोलून दाखवली.