पुणे । माँ आशापुरा माता मंदिर चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे गंगाधाम चौकाजवळील माँ आशापुरा मंदिर येथे नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने सेंट हिलदास शाळेतील मुलींचा ‘कन्या पूजनाचा’ कार्यक्रम पार पडला. या धार्मिक आणि संस्कृतिक कार्यक्रमात शाळेतील लहान मुलींना विशेष आमंत्रित करून पारंपरिक पद्धतीने पूजन करण्यात आले. या कार्यक्रमाला, सेंट हिलदास शाळेतील शिक्षक, विद्यार्थिनी तसेच माँ आशापुरा माता मंदिर ट्रस्टचे प्रमुख व जीतो अॅपेक्स चे राष्ट्रीय अध्यक्ष विजय भंडारी व ट्रस्टचे चेतन भंडारी, तसेच मंदिर स्वयंसेवक भारती भंडारी, गजल भंडारी, पूर्वी भंडारी, शिल्पा कटारिया, रेखा खंडेलवाल, सुजाता गोयल, तनुजा कावेडिया, स्वाती पोतदार, मंजू परदेशी,अलका खंडेलवाल, कविता अग्रवाल, शीतल भुरत, करुणा मेहता, उर्मिला दुसद, नीता बोरा, पन्ना पूनमिया, अनिता बलदोटा, रुपाली भंडारी, प्रियंका परमार, पूनम ओसवाल, प्रीती छाजेड, रीता जैन, वंदना राठोड आदी उपस्थित होते.
देवींचे स्वरूप मानल्या जाणाऱ्या मुलींचे विशेष पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यांना तिलक लावून, प्रसाद देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच या विशेष दिवशी मंदिरात आलेल्या सर्वांनी सकारात्मक ऊर्जा अनुभवली. मंदिराच्या परिसरात मोठ्या श्रद्धेने आणि उत्साहात पार पडलेल्या या कार्यक्रमात, सेंट हिलदास शाळेतील विद्यार्थिनींनी ही या कार्यक्रमात आनंदाने सहभाग नोंदवला, ज्यामुळे संपूर्ण वातावरणात एक भक्तिमय आणि उत्साही माहोल निर्माण झाला. या उपक्रमामुळे मुलींना त्यांच्या महत्त्वाची आणि सन्मानाची जाणीव करून देण्यात आली, तसेच समाजात मुलींच्या सन्मानाचा संदेश पसरवण्याचा प्रयत्न करण्यात आला. तसेच या कार्यक्रमात सर्व सहभागी मुलींच्या चेहऱ्यावर उत्साह आणि आनंद स्पष्टपणे दिसत होता.या कार्यक्रमाच्या आयोजनामागील उद्दिष्ट, ‘कन्या पूजनामुळे समाजात मुलींच्या महत्वाचे स्मरण होते. तसेच त्यांच्या सन्मानाने आणि पूजनाने त्यांच्याबद्दलची आदर भावना अधिक वृद्धिंगत होते ‘ असा होता.