मुंबई | महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा मी मुलगा नसतो तर मी आज राजकारणात नसतो. राज ठाकरे यांनी मला दिलेली संधी मी तरुणांना देणार असल्याचे मोठे वक्तव्य राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांनी केले आहे.
त्याचबरोबर त्यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचे संकेत देखील दिले आहेत. त्यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखती दरम्यान असे म्हटले आहे. शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्यानंतर आता अमित ठाकरे हे देखील निवडणुकीच्या मैदानात उतरणार का याची उत्सुकता आहे.
दरम्यान, अमित ठाकरे सध्या महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांचा दौरा करत आहेत. विविध भागांमध्ये जाऊन ते कार्यकर्त्यांच्या भेटी घेत आहेत. ठिकठिकाणी त्यांच जोरदार स्वागत केलं जात आहे. अशाच दौऱ्यादरम्यान एका वृत्तपत्राला दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी निवडणूक लढवण्याचे संकेत दिले. आणि सध्याची राजकीय परिस्थिती पाहता माझी राजकारणात यायची इच्छाच झाली नसती असेदेखील ते म्हणाले. सध्याची राजकीय परिस्थिती, मनसेची पुढील वाटचाल याबाबत काय होणार ते पाहावे लागेल.